रत्नागिरी: हातखंबा अपघातांची मालिका सुरूच असून, येथे पुन्हा एकदा अपघात झाला आहे. एक मालवाहू ट्रक विरुद्ध दिशेला जाऊन चरात उलटला. हातखंबा येथे सलग तिसरा अपघात असल्याने महामार्गाच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने त्याचा जीव बचावला.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, मात्र ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या चरात किंवा संरक्षक कठड्यांबाबत योग्य उपाययोजना नसल्याने असे अपघात घडत आहेत. स्थानिक प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष घालून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.