GRAMIN SEARCH BANNER

राजापुरातील डॉ. हेमंत अकोलकर राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित

Gramin Varta
23 Views

राजापूर : तालुक्यातील हातिवळे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे उपप्राचार्य व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. हेमंत अकोलकर यांना शिक्षण, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मराठी साहित्य मंडळाकडून अहिल्यानगर येथे झालेल्या 16 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ कादंबरीकार दशरथ यादव, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे तसेच संस्थेचे माजी सचिव प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. हेमंत अकोलकर हे गेल्या 15 वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असून त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील 67 संशोधनपर लेख, 11 आंतरराष्ट्रीय पुस्तके आणि सहा पेटंट प्रकाशित झाले आहेत.

या पुरस्काराबद्दल त्यांचे सरोजमाई पाटील, संगीताताई पाटील, प्रशांतदादा पाटील, विक्रांत पाटील, सतीश रेडीज, प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, डॉ. संजय मेस्त्री तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि समिती सदस्यांनी अभिनंदन केले आहे

Total Visitor Counter

3368833
Share This Article