उद्यापासून मोहिमेला प्रारंभ; 846 ग्रामपंचायतींना मिळणार ‘जोखमीनुसार’ कार्ड श्रेणी
रत्नागिरी: जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन कक्षाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे मोठे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. येत्या 2 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत मान्सून पश्चात स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणांतर्गत जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींमधील एकूण 7,790 सार्वजनिक जलस्रोतांचा समावेश असणार आहे.
पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत हे महत्वपूर्ण सर्वेक्षण वर्षातून दोनवेळा म्हणजे पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर केले जाते. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता व सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि संभाव्य आरोग्य धोके वेळीच ओळखून त्यावर उपाययोजना करणे हा सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे जि.प. पाणी व स्वच्छता विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
या स्वच्छता सर्वेक्षणाची जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. सर्वेक्षण ग्रामपंचायतीमधील जलसुरक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्यसेवक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सर्वेक्षण असून, सर्वेक्षणाच्या निकषांनुसार तसेच स्रोतांच्या जोखीमेनुसार वर्गीकरण करून ग्रामपंचायतींना लाल, हिरवे, पिवळे व चंदेरी कार्ड वितरीत केले जाणार आहेत.
जोखमीनुसार ग्रामपंचायतींना होणारे कार्ड वितरण खालीलप्रमाणे असेल:
लाल कार्ड: ग्रामपंचायतींमधील 70 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या तीव्र जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून असल्यास हे कार्ड दिले जाईल.
हिरवे कार्ड: ग्रामपंचायतीमधील 70 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या कमी जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून असल्यास हे कार्ड दिले जाईल.
पिवळे कार्ड: ग्रामपंचायतीमधील 70 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या तीव्र जोखीम अथवा कमी जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून नसल्यास हे कार्ड देण्यात येईल.
चंदेरी कार्ड: सलग पाच वर्षे साथीचा उद्रेक न झालेल्या आणि पाच वर्षे हिरवे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींना हा विशेष सन्मान दिला जाईल.
या सर्वेक्षणाअंतर्गत तालुकानिहाय स्रोतांची संख्या देखील निश्चित करण्यात आली आहे, जी खालीलप्रमाणे आहे:
