लांजा: आमदार किरण सामंत यांच्या निपक्षपाती, विकासाभिमुख आणि सर्वधर्म समभावाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लांजा शहरातील अनेक युवकांनी तसेच युवा नेतृत्व अरबाज नेवरेकर आणि कनगवली ग्रामपंचायत सदस्य शकील वाडेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार सामंत यांच्या कार्यपद्धतीने आणि सर्व समाज बांधवांना समान न्याय देणाऱ्या भूमिकेने प्रेरित होऊन या युवकांनी हातात शिवसेनेचा भगवा घेतला. यामुळे लांजा शहरात शिवसेनेचा जनाधार आणखी मजबूत होताना दिसत आहे.
आमदार किरण सामंत यांच्या हस्ते नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सामंत म्हणाले की, “शिवसेना ही सर्वसामान्य जनतेची आणि प्रत्येक धर्माच्या, समाजाच्या बांधवांची सेना आहे. लांजा शहराच्या विकासासाठी एकदिलाने काम करणे हेच आमचे ध्येय आहे.” शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून जनतेच्या सेवेसाठी झटणारे एक कुटुंब आहे आणि ग्रामपातळीपासून राज्य पातळीपर्यंत विकासाची गती वाढवण्यासाठी अशा तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कनगवली ग्रामपंचायत सदस्य शकील वाडेकर आणि अरबाज नेवरेकर यांच्यासह लांजा शहरातील अनेक युवकांनी आमदार सामंत यांच्या विकासाभिमुख आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीने प्रेरित होऊन शिवसेनेचे सदस्यत्व स्वीकारले. आमदार सामंत यांच्या कार्यकाळात सर्व समाजघटकांना समान न्याय मिळावा, विकास सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने राबविण्यात आलेल्या योजनांमुळे मुस्लिम समाजातही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक तरुणांच्या म्हणण्यानुसार, “आमदार सामंत हे सर्व धर्मांतील नागरिकांना एकसमान न्याय देतात आणि नेहमी सर्वांच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे आम्ही शिवसेनेवर विश्वास ठेवला.”
यावेळी शकील वाडेकर, अक्षय सागवेकर, रिजवान मापारी, नइम मापारी, आरिफ चिखली, कैफ मनियार, राजू तूळसनकर, संतोष कुंभार, साहिल वनू, तबरेज दसुरकर, तौसीम मापारी, मोहम्मद याहू, मंगेश कुंभार, आलिम मापारी, शफी मापारी यांच्यासह अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, शहर प्रमुख सचिन डोंगरकर, संदीप दळवी, मुन्ना खामकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. युवकांच्या या मोठ्या प्रवेशामुळे लांजा शहर परिसरात शिवसेनेला नवसंजीवनी मिळाली असून पक्ष अधिक मजबूत होईल यात शंका नाही.