GRAMIN SEARCH BANNER

श्रीवर्धनमध्ये भीषण अपघात; टेलर पलटी होऊन पिकअप टेम्पो चिरडला, एकाचा मृत्यू तर ७ मजूर जखमी

Gramin Varta
102 Views

श्रीवर्धन/संदीप लाड : तालुक्यातील बोडणी फाटा येथे आज सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. वळणदार रस्ता आणि तीव्र उतार असतानाही भरधाव वेगाने जाणाऱ्या एका टेलरने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, टेलर (क्र. MH-46 BB 4712) हा बोडणी फाटा येथील धोकादायक वळणावर आणि उतारावर अत्यंत वेगात होता. वेगावर नियंत्रण न राहिल्याने हा टेलर अचानक पलटी झाला. टेलर पलटी होत असताना त्यावरील लोखंडी वस्तू निसान कारला (क्र. MH-02 DJ 9885) घासल्याने कारचे मोठे नुकसान झाले.परंतु, हा अपघात एवढ्यावरच थांबला नाही. पलटी झालेला हा अजस्त्र टेलर थेट शेजारून जाणाऱ्या पिकअप टेम्पोवर (क्र. MH-06 G 9320) कोसळला. या भीषण अपघातात टेम्पो टेलरखाली पूर्णपणे दाबला गेला.एकाचा मृत्यू, सात जखमीया अपघातात पिकअप टेम्पो चालक अजय भालचंद्र जाधव (वय २५ वर्षे, रा. बागमांडला काटकवाडी) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

तसेच टेम्पोमधील ७ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलिस तपास सुरू घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. भरधाव वेग आणि निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत असून, श्रीवर्धन पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3350586
Share This Article