GRAMIN SEARCH BANNER

नागरिकांच्या न सुटणाऱ्या समस्या बाबत गाव विकास समितीच्या वतीने ॲड. सुनिल खंडागळे घेणार ‘जनता दरबार’

Gramin Varta
121 Views

वांझोळे,आंगवली, हरपुडे पंचक्रोशी व साडवली,देवरुख पंचक्रोशी मधील नागरिकांसाठी सलग चार दिवस उपक्रम

संगमेश्वर : गाव विकास समिती, संगमेश्वर तालुका यांच्या वतीने  नागरिकांच्या प्रश्नांबाबत ॲड. सुनिल खंडागळे यांचा ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे.शासकीय कामे होण्यास होणारी दिरंगाई, शासकीय दाखले काढताना येणाऱ्या अडचणी, नुकसान भरपाई, पीक विमा माहिती आणि वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना यांसारख्या सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा ‘जनता दरबार’ होत असल्याची माहिती गाव विकास समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड आणि संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या संकल्पनेतून, ॲड. सुनिल खंडागळे यांच्या पुढाकाराने लोकांच्या हितासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

जनता दरबारचे वेळापत्रक आणि ठिकाण:
१२ ऑक्टोबर: मौजे – वांझोळे पंचक्रोशीसाठी गोताड वाडी येथे.
  १३ ऑक्टोबर: आंगवली पंचक्रोशी व १४ ऑक्टोबर हरपुडे पंचक्रोशीसाठी,15 ऑक्टोबर साडवली, ओझरे, तळवडे, देवरुख या गावातील नागरिकांसाठी MG कम्युटर्स देवरुख, हायस्कूल समोर.

नागरिकांनी त्यांच्या समस्यांबाबत योग्य त्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन संघटने मार्फत करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
जनता दरबार बाबत अधिक माहितीसाठी नितीन गोताड यांच्याशी मो. ९३२२५१६८८६ या क्रमांकावर संपर्क साधू शकता असे आवाहन गाव विकास समितीने केले आहे.

Total Visitor Counter

3379520
Share This Article