GRAMIN SEARCH BANNER

राज्यस्तरीय चित्रकला परीक्षेत सावर्डे विद्यालयाचे उज्ज्वल यश;शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

Gramin Varta
51 Views

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे यांनी राज्य शासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
एलिमेंटरी परीक्षेसाठी विद्यालयातील ५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेड, १५ विद्यार्थ्यांनी ‘बी’ ग्रेड तर ३६ विद्यार्थ्यांनी ‘सी’ ग्रेड प्राप्त केला आहे.
त्याचप्रमाणे इंटरमिजिएट परीक्षेसाठी ३३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये ८ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेड, १० विद्यार्थ्यांनी ‘बी’ ग्रेड आणि १५ विद्यार्थ्यांनी ‘सी’ ग्रेड मिळवून विद्यालयाच्या यशाची परंपरा अधिक बळकट केली आहे.

विद्यार्थ्यांचे हे यश शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियमित सराव व पोषक शैक्षणिक वातावरणाचा परिणाम असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख अमित साळवी यांच्यासह गौरी शितोळे, अमृता घाग, अनुजा बागवे, दिशा विचारे व समृद्धी साळुंखे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, ज्येष्ठ विश्वस्त शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व संचालक, सचिव महेश महाडिक, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन करून कौतुक केले.

Total Visitor Counter

3198848
Share This Article