GRAMIN SEARCH BANNER

रायगड येथे मतदान यंत्र तपासणी कार्यक्रम सुरू

Gramin Varta
15 Views

रायगड:  रायगड जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी मतदान यंत्रांतील Burnt Memory तपासणी व पडताळणी कार्यक्रम सुरु झाला आहे. हा कार्यक्रम दिनांक २१ जुलै पासून सुरू झाला असून २३ जुलै पर्यंत तीन दिवस चालणार आहे.

जिल्हाधिकारी रायगड, श्री. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखी मध्ये सदरची प्रक्रिया पार पाडली जात आहे.

जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, रायगड जिल्हा मध्‍यवर्ती मतदान यंत्र वेअरहाऊस, शितोळे, पेण येथे ही संपूर्ण प्रक्रिया व्हिडीओ चित्रिकरणद्वारे तपासणी सुरु आहे. दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत ही तपासणी केली जात आहे.या प्रक्रियेमध्ये १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातील ५ मतदान केंद्रावरील आणि १९२ अलिबाग विधानसभा मतदारसंघातील ४ मतदान केंद्रावरील निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन्सच्या Burnt Memory ची पडताळणी सर्व संबंधित निवडणूक उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत बेल कंपनीचे अभियंता यांचे मार्फत केली जात असून, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राहणार आहे.

Total Visitor Counter

3073034
Share This Article