GRAMIN SEARCH BANNER

पाचलच्या सरस्वती विद्यामंदिर व महाविद्यालय प्रशालेच्या नवगतांचे स्वागत

Gramin Search
9 Views

तुषार पाचलकर : राजापूर तालुक्यातील, पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ-पाचल, संचलित सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल, या प्रशालेमध्ये सोमवारपासून सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात “सरस्वती विद्या मंदिर पाचल माजी विद्यार्थी वेल्फेअर असोसिएशन” च्या वतीने “विद्यार्थी स्वागत” उपक्रम आयोजित करून करण्यात आला होता. या निमित्ताने सोमवारी पहिल्या दिवशी 1100 पेक्षा जास्त शिक्षण घेत असलेल्या प्रशालेत सुमारे ७०० विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन, चॉकलेट आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व पुढील शैक्षणिक वर्षांसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी विद्यार्थी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र रेडीज, सेक्रेटरी सुशील नारकर, खजिनदार संतोष वायकुळ, कार्यकारणी सदस्य सुनील रेडीज, निलेश पाथरे, सदस्य श्रीधर नारकर तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक गंगाराम सक्रे,  खजिनदार राजन लब्दे, सहसचिव किशोर नारकर, शाळेचे मुख्याध्यापक तानाजी देसाई, पर्यवेक्षिका खरात मॅडम उपस्थित होते.

Total Visitor Counter

2649910
Share This Article