GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत काँग्रेस भवनसमोरील रस्त्यावर बेशुद्ध आढळलेल्या अज्ञाताचा मृत्यू

Gramin Search
8 Views

रत्नागिरी : शहरातील काँग्रेस भवनसमोरील रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका ५५ वर्षीय अज्ञात पुरुषाचा उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी, १७ जून रोजी मध्यरात्री १२.१५ वाजता घडली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, १६ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास काँग्रेस भवन येथील दरबार हॉटेलसमोरील रस्त्यावर एक ५५ वर्षांचा अनोळखी पुरुष बेशुद्ध अवस्थेत लोकांना आढळला. नागरिकांनी तात्काळ याबद्दल पोलिसांना आणि १०८ रुग्णवाहिकेला माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्या अज्ञात व्यक्तीला सायंकाळी ५.३० वाजता उपचारासाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर त्वरित उपचार सुरू केले आणि पुढील उपचारांसाठी त्याला पुरुष मेडिकल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी मध्यरात्री १२.१५ वाजता डॉ. कुणाल शर्मा यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Total Visitor Counter

2648156
Share This Article