GRAMIN SEARCH BANNER

लांजात २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कणगवली शिंदेवाडीतील घटना

Gramin Varta
13 Views

लांजा : तालुक्यातील कणगवली शिंदेवाडी येथे गुरुवारी (७ ऑगस्ट) दुपारी सुमारे २.३० च्या सुमारास २८ वर्षीय तरुणाने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रथमेश पर्शुराम मांडवकर (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या आत्महत्येचे लांजा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती मृताचा भाऊ पंकज पर्शुराम मांडवकर (वय ३१) याने लांजा पोलिस ठाण्यात दिली. प्रथमेशने घराजवळील गुरांच्या गोठ्यात लाकडी वाशाला दोरी बांधून गळफास घेतला. या वेळी त्याचे वडील बाजारासाठी लांजा येथे गेले होते, आई घरीच होती, तर भाऊ पंकज मजुरीसाठी येरवंडे येथे गेला होता.

प्रथमेश मांडवकर हा गवंडी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तो शांत व संयमी स्वभावाचा असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्याने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेचा अधिक तपास लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे करत आहेत. प्रथमेशच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

2647121
Share This Article