GRAMIN SEARCH BANNER

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे
मत्स्यालय प्रवेश करिता डिजिटल पेमेंट प्रणाली सुरु

Gramin Search
29 Views

रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ अंतर्गत एक प्रेक्षणीय असे ‘मत्स्यालय आणि मत्स्य संग्रहालय’ विद्यार्थी आणि पर्यटकांकरिता झाडगाव, रत्नागिरी येथे सुरु आहे. या मत्स्यालय व संग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यटकांनी डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा निर्माण करण्याची विनंती केली होती. दिनांक १८ जून २०२५ रोजी पर्यटक आणि विविध कार्यालयीन पेमेंट करिता डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. संशोधन केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांच्या हस्ते पूजा करून पी.ओ.एस. मशिन चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे प्रथम तिकीट डॉ. स्वप्नजा मोहिते यांना देऊन सुरुवात करण्यात आली. पर्यटकांनी यु.पी.आय. पेमेंट, डेबिट किंवा क्रेडीट कार्ड द्वारे पेमेंट करून या सोयीचा सर्व पर्यटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. आशिष मोहिते, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांनी केले. डिजिटल पेमेंट करिता आवश्यक पी.ओ.एस. मशिन, भारतीय स्टेट बँक, रत्नागिरी यांनी निशुल्क पुरविल्या बद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.  

सदर ‘ऑनलाईन पेमेंट प्रणाली’ सुरु करण्याकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. आसिफ पागारकर (सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक), डॉ. हरिष धमगये (अभिरक्षक व प्राध्यापक), प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम व प्रा. कल्पेश शिंदे (सहाय्यक संशोधन अधिकारी), श्रीम. व्ही. आर. सदावर्ते (जीवशास्त्रज्ञ) तसेच श्री. रमेश सावर्डेकर (वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक), श्री. महेश किल्लेकर (यंत्र चालक बोट) व श्री. दिनेश कुबल (बोटमन), श्रीम. जाई  साळवी (वरिष्ठ लिपिक), श्री. सचिन पावसकर (लिपिक), श्री. मनिश शिंदे (मत्स्यालय यांत्रिक), श्री. सुहास कांबळे व श्री. राजेंद्र कडव (शिपाई), श्री. प्रवीण गायकवाड (क्षेत्र संग्राहक), श्री. सचिन चव्हाण (मजूर), श्री. स्वप्नील आलीम, श्री. तेजस जोशी, श्री. योगेश पिलणकर, श्री. उल्हास पेडणेकर, श्री. दर्शन शिंदे, व श्री. प्रशांत पिलणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Total Visitor Counter

3369876
Share This Article