GRAMIN SEARCH BANNER

नाटे पोलीस ठाण्याचे संजय झगडे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

Gramin Search
6 Views

पाली : नाटे सागरी पोलीस ठाणे अंतर्गत सागवे पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय बाळकृष्ण झगडे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती  मिळाली असून त्यांना रत्नागिरी जिल्हाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते स्टार लावून सन्मानित करण्यात आले.

संजय झगडे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाल्याबद्दल नाटे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, नाटे सरपंच संदीप बांदकर, कात्रादेवी सागवे सरपंच सोनाली थुकरुल, व्यापारी संघटनेचे विद्याधर राणे, प्रकाश पारकर, रमेश लांजेकर, मच्छीमार संघटनेचे अमजद बोरकर,जुनेद मुल्ला यांनी अभिनंदन केले आहे.

Total Visitor Counter

2647215
Share This Article