चिपळूण : चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात शनिवारी सकाळी सुमारास एक मालवाहू ट्रक दरीत कोसळून गंभीर अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रकचालक आणि क्लिनर दोघेही जखमी झाले असून ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जखमी चालकाचे नाव सचिन दिलीप राठोड (वय 24, रा. विजापूर) असे आहे. त्याच्यासोबत क्लिनर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या संदर्भात रवींद्र लक्ष्मण पवार (वय 44, रा. विजापूर) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक राठोड हा आपला मालवाहू ट्रक घेऊन कुंभार्ली घाट उतरवत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक दरीत कोसळला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
या प्रकरणी ट्रक चालकावर पुढील तपास सुरू असून चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कुंभार्ली घाटात ट्रक दरीत कोसळला; चालक व क्लिनर गंभीर जखमी
