रत्नागिरी : शाळा भावेआडोम, तांबेवाडी (ता. जि. रत्नागिरी) येथे पालकांच्या सहकार्याने रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. हे शनिवार, दिनांक १२ जुलै २०२५ रोजी म्हणजे भरवण्यात आले आहे.
या प्रदर्शनात परिसरात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले होते. यामध्ये कुर्डू, काकवी, भारंगी, करटोली, अळू, टाकळा, कुड्याच्या शेंगा, अंबाडी इत्यादी भाज्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना या सर्व भाज्यांविषयी माहिती मिळाली आणि त्या आरोग्यासाठी कशा उपयुक्त आहेत, हेही समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. जयवंत तांबे, ग्रुप ग्रामपंचायत दांडेआडोम-भावेआडोमचे सरपंच मा. कैलास तांबे, श्री. सत्यवान तांबे तसेच अनेक महिला पालकांनी उपस्थित राहून प्रदर्शनाला भेट दिली.
प्रदर्शनाच्या निमित्ताने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे आहारातील महत्त्व समजावून दिले. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षक श्री. विजय शितप आणि श्री. सुहास पवार यांनी केले होते.
भावेआडोम, तांबेवाडी शाळेत रानभाज्यांचे प्रदर्शन
