GRAMIN SEARCH BANNER

राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध, भाजप – शिवसेनेकडून नवीन चेहरे

Gramin Varta
342 Views

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या राज्यसभेच्या सातही जागांवर कोण जाणार? याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. राज्यसभेतील 37 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि त्यातील सात जागा या महाराष्ट्राच्या वाट्याला आल्या होत्या.राज्यातील संख्याबळ पाहता, भाजपकडे 4, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे प्रत्येकी एक आणि महाविकास आघाडीकडे एक अशा जागा आल्या होत्या. या जागांवर कोण जाणार? ही निवडणूक बिनविरोध होणार का? असे अनेक प्रश्नांची उत्तरे आज, गुरुवारी 5 मार्च रोजी मिळाली आहे.राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत गुरुवारी 5 मार्चला होती. यादिवशी भाजपने यादी जाहीर केल्याप्रमाणे 4 जणांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिली. यामध्ये या नावांमध्ये विनोद तावडे आणि रामदास आठवले यांच्यासोबत माया इवनाते, रामराव वडकुते यांचे नाव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तसेच, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांनी अर्ज भरला आहे. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. तर, महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नावावर एकमत झाले असून त्यांची तब्येत बरी नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण केली. विशेष म्हणजे या सातही जागांसाठी सात अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असून आता फक्त औपचारिक घोषणाच बाकी आहे.शिंदेंचे धक्कातंत्र, ज्येष्ठांना डावलून नवीन चेहराराज्यसभेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अनेक नावे समोर येत होती. गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर, आनंद अडसूळ, संजय निरुपम तसेच राहुल शेवाळे यांच्या नावाची चर्चा होती. पण, एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारे यांची निवड करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. यावेळी, ज्योती वाघमारे यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत.महाराष्ट्राच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडलेराज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. त्याचसोबत राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांनीदेखील दोन अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार हे स्वतः अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केली. आजारी व्यक्ती राज्यसभेचा अर्ज दाखल करण्यासाठी येऊ शकला नाही अशी महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरली आहे.

Total Visitor Counter

3150808
Share This Article