GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये दुकान फोडून ७६ हजारांचे ऍल्युमिनियम साहित्य लंपास

Gramin Varta
204 Views

चिपळूण : शहरातील काविळतळी परिसरात असलेल्या ‘कोयना ग्लास अँड ऍल्युमिनियम’ या दुकानात घुसखोरी करून सुमारे ७६ हजार रुपयांचे ऍल्युमिनियम साहित्य चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात शुक्रवारी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पवन दिलीप संकपाळ (वय ३८, रा. कळंबस्ते) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबर रोजी रात्री ८ ते २३ डिसेंबर रोजी सकाळी ९ या कालावधीत चोरट्याने दुकानाच्या शेडच्या मागील बाजूचा पत्रा नटबोल्ट काढून उघडत दुकानात प्रवेश केला.

दुकानातून चोरट्याने सुमारे ६० हजार रुपये किमतीचे ऍल्युमिनियम खिडकीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध आकारांच्या पट्ट्यांचे तीन बंडल, १० हजार रुपये किमतीचे लहान-मोठे ऍल्युमिनियम पट्ट्यांचे तुकडे तसेच ६ हजार रुपये किमतीच्या साडेचार बाय चार फूट आकाराच्या तयार ऍल्युमिनियम खिडकीचे एकूण सात फ्रेम्स असा एकूण ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही चोरी उघडकीस आल्यानंतर पवन संकपाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3366895
Share This Article