GRAMIN SEARCH BANNER

गोवा राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी संकेता सावंत यांची महाराष्ट्राकडून पंच म्हणून निवड

Gramin Varta
87 Views

रत्नागिरी : गोवा येथे होणाऱ्या ३१ व्या राज्यस्तरीय सब-ज्युनिअर क्योरोगी तसेच ११ व्या पुमसे सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राकडून ईगल तायक्वांदो अकॅडमीच्या प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.

तायक्वांदो असोसिएशन ऑफ गोवा यांच्या वतीने आयोजित ३१ वी सब-ज्युनिअर स्टेट मुलगे व मुली क्योरोगी चॅम्पियनशिप तसेच ११ वी गोवा स्टेट सब-ज्युनिअर पुमसे आणि मिनी सब-ज्युनिअर मुलींची तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२५-२६ ही स्पर्धा २ जानेवारी रोजी गोवा येथील फोंडा इनडोअर क्रीडा संकुलात पार पडणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी संकेता संदेश सावंत यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.

अभ्युदय नगर येथील नगर परिषद बहुउद्देशीय सभागृहात सुरू असलेल्या ईगल तायक्वांदो अकॅडमीमध्ये संकेता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुले तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत असून विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत आहेत.

गोवा येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य तायक्वांदो संघटनेचे कोषाध्यक्ष व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी तसेच ईगल तायक्वांदो अकॅडमीच्या पालकवर्गाकडून संकेता संदेश सावंत यांचे अभिनंदन करण्यात येत असून स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Total Visitor Counter

3369434
Share This Article