कुणबी भवन हॉलचे काम अंतिम टप्प्यात; नोव्हेंबरपासून लग्नसोहळ्यांसाठी उपलब्ध
संगमेश्वर : कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ ग्रामीण शाखा, संगमेश्वर आणि मुंबई मुख्य कार्यालय यांची संयुक्त बैठक आंबेड खुर्द येथील कुणबी भवनात पार पडली. या बैठकीत कुणबी भवनाचे बांधकाम आणि व्यवस्थापनाविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हॉलचे काम लवकरच पूर्ण करून नोव्हेंबरपासून विवाह व इतर समारंभासाठी उपलब्ध करून देण्याचे ठरले.
यावेळी संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई यांच्याकडून मंडळास पाच लाख रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली. पतपेढीचे अध्यक्ष शांताराम सालप यांनी या देणगीचा धनादेश सचिव शंकर बोले यांच्याकडे सुपूर्द केला.
बैठकीस जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संतोष थेराडे, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यालय अध्यक्ष शंकर शिगवण, सचिव शांताराम गोरुले, पतपेढीचे संचालक पांडुरंग खाडे, संगमेश्वर शाखेचे पदाधिकारी व सदस्य तसेच सुनिल गेल्ये, बाळकृष्ण कास्टे, माजी सभापती कृष्णा हरेकर, डावळ गुरुजी, मंडप डेकोरेशन व्यावसायिक विजय कुवळेकर, दत्ता ओकटे, सुरेश दसम, थुळ गुरुजी, पोलीस पाटील भामटे, प्रदीप सोलकर, दत्ता लाखण, संतोष मुंडेकर, प्रकाश घडशी, दशरथ घेवडे, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कांगणे, यशवंत चांदे, सुशील भायजे, कुवळेकर गुरुजी, रामचंद्र बांबाडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कुणबी भवन हॉलचे काम आता अंतिम टप्प्यात असून, लवकरच हा हॉल विवाहसोहळे, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.
संगमेश्वर तालुका कुणबी सह. पतपेढीकडून कुणबी शिक्षण प्रसारक मंडळास ५ लाखांची देणगी
