GRAMIN SEARCH BANNER

राजापुरातील अणुस्कुरा चेक पोस्टवर गोवा बनावटीची दारू जप्त, 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

तुषार पाचलकर / राजापूर

मागील काही दिवस तालुक्यात मोठया प्रमाणावर गोवा बनावटीच्या दारू विरोधात पोलिसांकडून कारवाई होत असून अणुस्कुरा चेक पोस्ट येथे रायपाटण पोलीस दूरक्षेत्रच्या वतीने धडक कारवाई करताना वाहनसह गोवा बनवटीच्या दारूचे सुमारे ९५ बॉक्स पोलिसांनी जप्त केले. सुमारे ६३ हजार ६५० रुपये किंमतीची दारू असल्याची माहिती रायपाटण पोलीस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी दिली.दरम्यान मंगळवारी मध्यरात्री दोन च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

मागील काही महिने राजापूर तालुक्यात कुठे ना कुठे गोवा बनावटीच्या दारू विरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबविली असल्याचे चित्र असून राजापूर एस. टी.आगारासमोर,तर दोन, तीन वेळा पोलिसांनी लाखो रुपयांची गोवा बनवटीची दारू पकडली होती. त्यानंतर आता राजापूर तालुक्याच्या हद्दीत अणूस्कुरा घाटात रायपाटण पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी गोवा बनवटीची दारू वाहनासह पकडली.

राजापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अणुस्कुरा चेकपोस्ट येते. येथे रायपाटण पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस कर्मचारी नाकाबंदी करीत असताना अचानक टाटा कंपनीची टाटा इंट्रा एम एच ०७,ए. जे.३७३९ ही गाडी आली असता तेथे उपस्थित असलेले ए.एस.आय.कमलाकर पाटील पोलिस शिपाई बळीप,आणि पो. कॉ. रामदास पाटील असे नाकाबंदी करत असताना त्यांनी ती गाडी थांबविली आणि त्या गाडीची तपासणी केली. त्यावेळी आतमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे एकूण ९५ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी पकडलेल्या दारूची किंमत ६३६५०/- रुपये व सुमारे तीन लाख किंमतीचे वाहन देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकूण ३ लाख ६३ हजार ६५० किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.असून  महा. दारूबंदी कायदा ६५(अ)(इ)प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Total Visitor Counter

2455560
Share This Article