GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : कारवलीत गाडीच्या धडकेत दीड वर्षाची बालिका गंभीर

Gramin Varta
303 Views

राजापूर : तालुक्यातील कारवली येथे बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास दीड वर्षांच्या संस्कृती किरण चव्हाण या बालिकेला वडाप गाडीची धडक बसून ती गंभीर जखमी झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शपंतला किरण चव्हाण या कारवली येथे वास्तव्यास असून त्या दिवशी पाचल बाजारहाट करून परत येत होत्या. कारवली रस्त्यावर वडाप गाडीतून उतरत असताना त्या चालकाला पैसे देत होत्या, तेव्हाच त्यांची मुलगी संस्कृती रस्त्याच्या कडेला उभी होती. याच दरम्यान वडाप चालकाने अचानक गाडी मागे घेतली. अचानक झालेल्या हालचालीत संस्कृती खाली कोसळली आणि गाडीचे चाक तिच्या पोटावरून गेले.

अपघातानंतर शपंतला चव्हाण आणि नातेवाईकांनी बालिकेला तातडीने कारवली–पाचल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारांसाठी १०८ रुग्णवाहिकेमधून तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची नोंद दुसऱ्या दिवशी राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3386923
Share This Article