रत्नागिरी : शहरातील परटवणे परिसरात दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सुगंधा सुधाकर जोशी (वय ६९, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात त्या जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान १७ डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरी परटवणे येथे दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू





