GRAMIN SEARCH BANNER

मुंबई–गोवा महामार्गावर भरणे येथे तिहेरी वाहन अपघात; अल्टो चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
309 Views

खेड : मुंबई–गोवा महामार्गावरील भरणे येथील कोल्हापूर गॅरेजसमोर तिहेरी वाहनांचा अपघात झाला. या अपघातप्रकरणी अल्टो कारचालक केतन महेंद्र चव्हाण (वय ३९, रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातात अशपाक शेख महम्मद शेख (वय २९, रा. सुकिवली–देऊळवाडी) हे जखमी झाले आहेत. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, अशपाक शेख हे सुकिवली–देऊळवाडी येथून सिमेंट उतरवून परत सुकिवलीकडे जात होते. याच वेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा एक टेम्पो नियंत्रण सुटून उजव्या बाजूला उलटला. त्यामुळे मागून येणाऱ्या एका कारने टेम्पोला धडक दिली.

दरम्यान, अल्टो कार दुभाजकावर आदळून एका दुचाकीला धडकली. या तिहेरी अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3376312
Share This Article