GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात रेल्वेच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

चिपळूण :कळंबस्ते–पवारवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर रेल्वेच्या धडकेत नारायण विठोबा जाधव (वय ९०, रा. दळवटणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण जाधव हे कळंबस्ते–पवारवाडी परिसरातील रेल्वे ट्रॅक परिसरात होते. याच दरम्यान भरधाव येणाऱ्या रेल्वेने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने रेल्वे प्रशासन व पोलिसांना कळवले.

घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. याबाबतची खबर शंकर नारायण जाधव यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3474566
Share This Article