GRAMIN SEARCH BANNER

खेडमधील पशुवैद्यकीय दवाखान्यात चोरी; ३० हजारांचे नायट्रोजन साठवण भांडे लंपास

Gramin Varta
89 Views

खेड : तालुक्यातील धामणी येथील श्रेणी–२ पशुवैद्यकीय दवाखान्यात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. दवाखान्यातील सुमारे ३० हजार रुपये किमतीचे नायट्रोजन वायू साठवण्यासाठी वापरण्यात येणारे भांडे चोरट्यांनी लंपास केले आहे. या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुदाम काशिनाथ कदम (रा. रेवीवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार २२ ते २६ नोव्हेंबरदरम्यान ही चोरी झाली असून, चोरट्यांनी दवाखान्याच्या दरवाज्याचे कुलूप तोडून गोलाकार, उभट व पांढऱ्या रंगाचे नायट्रोजन साठवण भांडे चोरून नेले.
दवाखान्यातील शासकीय साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास येताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3374169
Share This Article