रत्नागिरी: येथील खासगी निवृत्त माहिती अधिकारी राजीव लिमये यांच्या बखर कर्ल्याची या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी, दि. २९ जून रोजी होणार आहे.जन्मगावाच्या प्रेमातून स्फुरलेल्या, गावातील व्यक्तिमत्त्वांचे, ग्रामीण संस्कृतीचे, मानवी परस्परसंबंधांचे चित्रण या पुस्तकात आहे.
रत्नागिरीतील सत्त्वश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी सायंकाळी ५ वाजता मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्हमध्ये होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीचे अध्वर्यु, मराठी साहित्य आणि कला क्षेत्राचे व्यासंगी जाणकार प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल. लेखक आणि विधिज्ञ विलास पाटणे, प्रकाशक प्रमोद कोनकर या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कर्ला येथील सहयोग ग्रंथालयाच्या सहयोगाने आयोजित केलेल्या या समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन वरुण लिमये, सौ. मुग्धा लिमये यांनी केले आहे.
रत्नागिरी : बखर कर्ल्याची पुस्तकाचे उद्या प्रकाशन
