रत्नागिरी: येथील राष्ट्रसेविका समितीच्या कुसुम या हस्तलिखिताचे प्रकाशन थाटात झाले.हा समारंभ राष्ट्रसेविका समिती आणि रत्नकोंदणतर्फे करण्यात आला. प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सीमा कदम यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी महिलांसाठी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
हस्तलिखितासाठी स्वप्नजा मोहिते, डॉ. स्नेहल जोशी, डॉ. मंगल पटवर्धन, उमा जोशी यांनी मुखपृष्ठ तसेच मलपृष्ठ आणि आतील चित्रे काढून दिली. तसेच हेमा शिरगावकर यांनी सुंदर हस्ताक्षरात लेखन केले. त्यांचे कौतुक प्रमुख पाहुण्या डॉ. सीमा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि देवी अष्टभुजेला वंदन करून कार्यकम सुरू झाला. सुनेत्रा जोशी यांनी रत्नकोंदणतर्फे प्रास्ताविक आणि मनोगत व्यक्त केले. मीरा भिडे यांनी समितीच्या विविध सेवाकार्याची माहिती आपल्या मनोगतात दिली. आजही हस्तलिखिताचे कसे महत्व आहे ते आईने लिहिलेल्या पत्राने सगळ्यांना पटवून दिले.समारंभाचे सूत्रसंचालन मनीषा शारंगधर यांनी केले.
रत्नागिरी : राष्ट्रसेविका समितीच्या कुसुम हस्तलिखिताचे प्रकाशन
