GRAMIN SEARCH BANNER

निवळी–जयगड रस्त्यावर ट्रकची उभ्या ट्रकला धडक

Gramin Varta
162 Views

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी–जयगड रस्त्यावरील आगरनरळ येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने दिलेली धडक अशी दुर्घटना बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

या प्रकरणी उदय मनोहर कुलकर्णी (३८, रा. कोरेगाव, सातारा) यांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अरमान सरवल अली (२८, रा. सानपाडा, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अरमान हा त्याचा ट्रक (एमएच ४६ बीयू ४३०७) निवळी–जयगड मार्गे नेत असताना आगरनरळ येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला (टीएन ७० एसी ०४५७) जाऊन धडकला, अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3366995
Share This Article