GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : शिरगाव–गुहागर विजापूर मार्गावर टँकर पलटी; चालकाचा जागीच मृत्यू

Gramin Varta
387 Views

चिपळूण: शिरगाव गुहागर विजापूर मार्गावरील वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळील कॅनल परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. काल रात्री (दि.२३) अंदाजे १०.३० वाजताच्या सुमारास टँकर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टँकर चालक चिपळूणकडे जात असताना हा अपघात झाला.

टँकर घसरू लागल्याने चालकाने उडी मारण्याचा प्रयत्न केला; मात्र टँकर तात्काळ पलटी झाल्याने तो त्यातच अडकून मृत्यूमुखी पडला. या ठिकाणी यापूर्वीही गंभीर अपघाताची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी कारच्या वाहनाचा मोठा अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी झालेल्या या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील पंचनामा व तपास सुरू केला आहे.

Total Visitor Counter

3366858
Share This Article