GRAMIN SEARCH BANNER

कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर यांची नियुक्ती

Gramin Search
9 Views

रत्नागिरी : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी (Chief Public Relations Officer) श्री. सुनील नारकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. जनसंपर्क क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ आणि व्यावसायिक अनुभव लक्षात घेता ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

सुनील नारकर हे १९९७ सालापासून कोकण रेल्वेच्या सेवेत कार्यरत असून, त्यांनी विविध पदांवर यशस्वीपणे जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात रत्नागिरी येथे प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (RTM) तसेच मडगाव येथे वरिष्ठ प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (Senior RTM) या पदांवर त्यांनी कार्य केले आहे.

तसेच बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक (Dy. Chief Commercial Manager – Dy. CCM) या महत्त्वाच्या पदावरही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या अनुभवामुळे कोकण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाच्या कार्यक्षमतेत अधिक भर पडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

व्यावसायिक आणि जनसंपर्क क्षेत्रात त्यांचा व्यापक अनुभव असल्यामुळे, कोकण रेल्वेच्या विविध उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे कार्य ते समर्थपणे पार पाडतील, अशी अपेक्षा आहे.

Total Visitor Counter

2645307
Share This Article