GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी झाडगाव येथे 26 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
342 Views

रत्नागिरी / प्रतिनिधी: शहरालगतच्या झाडगाव झोपडपट्टी परिसरात एका तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुनिल चंद्रकांत माने (वय २६, रा. झाडगाव झोपडपट्टी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, १६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. काही वेळानंतर ही बाब घरातील सदस्यांच्या लक्षात येताच त्याला तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणी पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3366950
Share This Article