GRAMIN SEARCH BANNER

युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंद असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याचा बुरुज ढासळला

सिंधुदुर्ग: विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्तीजवळ असणाऱ्या व्यंकट बुरुजाची समुद्रातील खालची बाजू लाटांच्या माराने ढासळली. त्यामुळे किल्ल्याची तटबंदी ढासळण्याची मालिका चालूच असल्याचे दिसून येत आहे.

पाऊस आणि लाटांचा मारा तीव्र असल्याने पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड होत असते.

पावसाळ्यात समुद्राला उधान येत असल्याने लाटांचा वेग या दरम्यान वाढत असतो. अशातच रात्रीच्या वेळेस किल्ल्यातील दिशादर्शक बत्तीजवळच्या व्यंकट बुरुजाची समुद्राकडील खालची बाजू ढासळली.

किल्ल्याची बांधणी करताना तसेच त्याची व्याप्ती वाढवताना त्यावेळेस सागर तटबंध आणि खडकांची नैसर्गिक रचना याचा विचारपूर्वक वापर करण्यात आला होता. विजयदुर्ग किल्ला हा खडकाळ द्वीपकल्पावर बांधलेला आहे. त्यामुळे तीन बाजूने खोल पाण्याचा व नैसर्गिक खडकांचे संरक्षण मिळतं. तत्कालीन परिस्थितीत समुद्राच्या लाटा सरळ तटबंदीवर आढळून किल्ल्याचे नुकसान होऊ नये म्हणून तिरक्या उताराची खडकांची मांडणी केली होती. जेणेकरून लाटांची ऊर्जा कमी होऊन ती परत समुद्रात वळवली जाते. कालांतराने निसर्गातील बदलांमुळे ही रचना कमकुवत होत गेली. मात्र नंतर हा मारा थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत. ‘ट्रायपॉड’ हा त्यावर उत्तम पर्याय होता. काँक्रीटच्या माध्यमातून हा ट्रायपॉड उभारणे आता गरजेचे झाले आहे. दरम्यान आता युनेस्कोच्या ताब्यात हा किल्ला गेल्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याचा कायापालट होणार आणि समुद्रातील कोसळलेल्या तटबंद्या पुन्हा भक्कमपणे उभ्या राहणार असा विश्वास विजयदुर्गवासीयांमधून व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

2475014
Share This Article