असुर्डे महावितरण शाखेचा उपक्रम – 10 कर्मचारी वर्ग तैनात
संदीप घाग / सावर्डे :
गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारच्या वीज समस्येमुळे भक्तांना गैरसोय होऊ नये, या उद्देशाने असुर्डे महावितरण शाखेतर्फे विशेष नियोजन करण्यात आले आहे. या काळात 10 कर्मचाऱ्यांची टीम रात्रंदिवस पाळीस सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यामुळे असुर्डे, खेरशेत, नायशी, कोकरे परिसरासह नांदगाव, येगाव, कुशिवडे, कुटरे, तळवडे, आबातखोल आदी गावांतील ग्रामस्थांना वीजपुरवठा सुरळीत राहणार आहे.
सावर्डे उपअभियंता खोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता प्रवीण राऊत यांनी हा उपक्रम राबवला असून ग्राहकांना वीजसेवा अखंडित मिळावी यासाठी विशेष लक्ष दिले आहे. ग्रामस्थ व गणेशभक्तांनी या उपक्रमाबद्दल राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
तैनात कर्मचारी व संपर्क क्रमांक (26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025):
26 ऑगस्ट: सतीश (9359785722), प्राचीन (8669488607)
27 ऑगस्ट: सतीश (9359785722), चोगले (9604802972)
28 ऑगस्ट: सतीश (9359785722), हरेकर मेस्त्री (9168697827)
29 ऑगस्ट: राजेशिर्के (8830212891), गावडे मेस्त्री (7875518698)
30 ऑगस्ट: सतीश (9359785722), गावडे मेस्त्री (7875518698)
31 ऑगस्ट: सतीश (9359785722), गावडे मेस्त्री (7875518698), चोगले (9604802972)
1 सप्टेंबर: सतीश (9359785722), गावडे मेस्त्री (7875518698)
असुर्डे, खेरशेत, नायशी, कोकरे परिसर गणेशोत्सवात वीजसमस्या मुक्त
