मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते व शरद पवार यांच्याकडे पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती.
तसेच ही जबाबदारी नव्या तरुण चेहऱ्याकडे देण्याची विनंती त्यांनी केली होती. दरम्यान प्रदेशाध्यक्ष पदावर शशिकांत शिंदे यांची निवड होणार आहे. ते मंगळवारी (दि.१५) पदाची सूत्रे स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग: जयंत पाटील यांचा ‘राष्ट्रवादी’च्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
