GRAMIN SEARCH BANNER

लांजा विकास आराखड्यावर ४ ते ७ ऑगस्टदरम्यान सुनावणी; १५०० हरकती अर्जांवर समिती देणार उत्तर

Gramin Varta
4 Views

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या प्रारूप शहरविकास योजनेवरील हरकतींवर सुनावणीसाठी तारखा निश्चित करण्यात आल्या असून, ४ ते ७ ऑगस्टदरम्यान नगरपंचायतीच्या सभागृहात ही सुनावणी पार पडणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत चार दिवस चालणाऱ्या या सुनावणीत त्रिसदस्य समितीकडून नागरिकांच्या १५०० हरकती अर्जांचा आढावा घेतला जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून संबंधित नागरिकांना पत्रव्यवहाराद्वारे सुनावणीची माहिती देण्यास सुरूवात झाली आहे. नगरपंचायतीच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नगरपंचायतीचे कर्मचारी थेट घरोघरी जाऊन पत्र देत आहेत, तर बाहेरील नागरिकांना पोस्टाच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे.

शहराचा प्रारूप विकास आराखडा २७ मार्च २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता. यावर हरकती नोंदवण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल होती. मात्र नागरिकांचा प्रतिसाद व नाराजी लक्षात घेऊन ही मुदत १५ मेपर्यंत वाढवण्यात आली. अंतिम मुदतीनंतर नगरपंचायतीकडे तब्बल १५०० हरकती अर्ज प्राप्त झाले होते.

या सर्व अर्जांवर सुनावणी होऊन नागरिकांच्या शंका आणि आक्षेपांना त्रिसदस्य समिती उत्तर देणार आहे. या निर्णयामुळे लांजा शहराच्या नियोजित विकास आराखड्याच्या अंमलबजावणीकडे महत्त्वाचे पाऊल टाकले जाणार आहे.

Total Visitor Counter

2654464
Share This Article