देवरुख: देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ रत्नागिरी जिल्हा शालेय खो-खो स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रीडांगणावर महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल आणि गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, देवरुखने उत्तम पद्धतीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मुलींच्या संघाने पात्रता सिद्ध करून जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची गेली अनेक वर्षाची परंपरा कायम राखली आहे. या स्पर्धेतील मुलांच्या गटात महाविद्यालयाला उपविजेतेपद प्राप्त झाले.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या खो-खो संघाने मिळवलेल्या यशाचे अभिनंदन करण्यासाठी व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी महाविद्यालयात छोटेखानी समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थी खेळाडूंची हितगुज साधून अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख प्रा. धनंजय दळवी, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे, तसेच शिक्षक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या दोन्ही संघांना क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर, क्रीडाशिक्षक तानाजी कदम व सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
मुलींच्या यशस्वी खो-खो संघात दिव्या सनगले, दिपाली सनगले, प्रीती सनगले, सानिका सनगले, सिद्धी चोरगे, सिद्धी पर्शराम, स्नेहा गावडे, सृष्टी आग्रे, पुर्वा टक्के, श्रुती किंजळे, सानिका आग्रे, अक्षरा कांबळे, पूर्वा वेद्रे यांचा समावेश आहे. यशस्वी खेळाडूंचा संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभूदेसाई, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.





