GRAMIN SEARCH BANNER

धामापूर हायस्कूलचा अभिषेक चंद्रकांत डिके जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत चमकला!

Gramin Varta
16 Views

धामापूर : सह्याद्री शिक्षण संस्था संचालित पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालय, धामापूर येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी अभिषेक चंद्रकांत डिके याने जिल्हा समाज कल्याण विभाग / जिल्हा दिव्यांग सक्षमणीकरण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी केली आहे.

अभिषेकने १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात अस्थि-व्यंग (Under-17) गटातून प्रथम क्रमांक पटकावत, जिल्ह्यातील एकूण १७ स्पर्धकांमधून अव्वल स्थान मिळवले. या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयामार्फत अभिषेकचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच त्याला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक एस. टी. कोदारे यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.

संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, संस्था संचालक मंडळ, शालेय समितीचे चेअरमन संभाजी शेठ महाडिक व सर्व सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एच. चंदनशिवे, तसेच शिक्षक एस. एस. पवार, व्ही. बी. बिजम, शिक्षक-केतर कर्मचारी खानविलकर, संजय चव्हाण आणि पालकवर्ग यांनी अभिषेकच्या यशाबद्दल कौतुकाचा वर्षाव करून हार्दिक अभिनंदन केले.

अभिषेकच्या या यशामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाक्षेत्रात नवी ऊर्जा निर्माण झाली असून, पुढील स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

3388098
Share This Article