GRAMIN SEARCH BANNER

आरोही पालखडे हिची जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तिहेरी सुवर्ण कामगिरी, विभागस्तरावर निवड

Gramin Varta
29 Views

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने शासकीय जलतरण तलाव रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या शालेय जलतरण स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे हिची विद्यार्थिनी कुमारी आरोही पालखडे हिने उत्तुंग कामगिरी केली.

१७ वर्षे वयोगटात खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत आरोहीने एकाच वेळी तीन सुवर्णपदके पटकावली.

२०० मीटर फ्रीस्टाइल – सुवर्णपदक,४०० मीटर फ्रीस्टाइल – सुवर्णपदक
४०० मीटर मिडले – सुवर्णपदक
रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून जलतरणपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तीव्र स्पर्धेतही आपल्या दमदार खेळाच्या बळावर आरोहीने सुवर्णपदकांची हॅटट्रिक करत विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. विभाग स्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची नामी संधी यामुळे सह्याद्री शिक्षण संस्थेला प्राप्त झाली आहे.

आरोहीच्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम सचिव महेश महाडिक,विद्यालय व्यवस्थापन समितीचे चेअरमन व ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर, सदस्य सुभाषशेठ मोहिरे , अन्वर मोडक, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

या यशामागे जलतरण कोच विनायक पवार तसेच मार्गदर्शक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे व प्रशांत सकपाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.आरोहीच्या या सुवर्ण कामगिरीमुळे सावर्डे परिसरातून  पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.आरोहीचे अभिनंदन करताना संचालक शांताराम खानविलकर,सुभाषशेठ मोहिरे, अन्वर मोडक, प्राचार्य राजेंद्र वारे व क्रीडा शिक्षक

Total Visitor Counter

2648395
Share This Article