GRAMIN SEARCH BANNER

पुणे रेव्ह पार्टी – सात जणांना दोन दिवस पोलीस कोठडी

Gramin Varta
22 Views

पुणे: पोलिसांनी शहरातील उच्चभ्रू भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटासह एकूण सात जणांना ताब्यात घेतले आहे.

प्रांजल खेवलकर यांच्यासह सर्व सातही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण कारवाईची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. पार्टीमध्ये कोकेन, दारू, बिअर बॉटल्स, हुक्का व त्याचे साहित्य सापडले. एकूण २.७ ग्रॅम कोकेन, १० मोबाईल फोन्स, तसेच इतर प्रतिबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या. ही कारवाई मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास करण्यात आली. आरोपींमध्ये ५ पुरुष आणि २ महिला सहभागी असल्याचे उघड झाले. सर्व आरोपींना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

Total Visitor Counter

3374416
Share This Article