GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : रिक्टोली फाटा येथे एसटी बस व दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी

Gramin Varta
316 Views

चिपळूण : चिपळूण-तिवरे रस्त्यावरील रिक्टोली फाटा येथे बुधवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात जयवंत बाबाजी शिंदे (रा. तिवरे) यांचा मृत्यू झाला असून गणेश पांडुरंग शिंदे (रा. तिवरे) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तिवरे-पुणे एसटी बस रिक्टोली फाट्याजवळील अवघड वळणावर आली असताना समोरून येणारी दुचाकी बसवर जोरदार धडकली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान जयवंत बाबाजी शिंदे यांचा मृत्यू झाला.

ऐन नवरात्र उत्सवाच्या काळात झालेल्या या घटनेमुळे शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून दसपटी परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघाताचा पुढील तपास अलोरे पोलीस स्टेशनचे भरत पाटील करत आहेत.

Total Visitor Counter

2647179
Share This Article