GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : बेलबाग येथे जुगारावर पोलिसांची धाड, एकाला घेतले ताब्यात

रत्नागिरी: शहरातील धनजी नाका बेलबाग येथे सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर रत्नागिरी शहर पोलिसांनी धाड टाकून एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२२ ऑगस्ट) दुपारी ४.४५ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमोल अरुण भोसले (पो.ह. १३९९) यांना धनजी नाका येथील एका घराच्या पाठीमागे बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली. यावेळी पोलिसांनी संजोग शशिकांत मयेकर (वय ३६, रा. १२३१ (अ) मयेकरवाडी, सोमेश्वर, रत्नागिरी) याला कल्याण मटका जुगार खेळवताना रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी १९१० रुपये रोख रक्कम, जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य आणि इतर वस्तू असा एकूण १९२० रुपयांचा ऐवज जप्त केला.

संजोग मयेकर हा कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना बेकायदेशीरपणे हा जुगार खेळवत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अमोल भोसले यांनी फिर्याद दिली असून, आरोपी संजोग मयेकर विरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यातील कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगारावर आळा घालण्यास मदत झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

2475129
Share This Article