GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : कापडगाव येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला

Gramin Varta
33 Views

रत्नागिरी : तालुक्यातील कापडगाव येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळून आला. पुनम महादेव कोत्रे (वय ३८, रा. कापडगाव कोत्रेवाडी, रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आहे.

पुनम या २८ जून रोजी राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. या प्रकरणी नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात केली होती.

५ ऑगस्ट रोजी पुनम यांचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह झरेवाडी पठारावर आढळला. अंगावरील कपड्यांवरून त्यांची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करत आहेत.

Total Visitor Counter

3366858
Share This Article