GRAMIN SEARCH BANNER

मंडणगडची सुकन्या गौरी कदम पुन्हा रंगमंचावर

Gramin Varta
84 Views

‘सिरियल किलर’ फॅमिली कॉमेडी नाटकात झळकणार; १ रोजी दापोली, तर २ रोजी खेडमध्ये प्रयोग

चिपळूण : झी मराठी अवॉर्ड २०२५ मध्ये ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील ‘जयंती’ ही विनोदी व्यक्तिरेखा साकारून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणारी मंडणगडची सुकन्या गौरी कदम पुन्हा रंगभूमीवर प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. सिंधुसंकल्प आणि अष्टविनायक एंटरटेन्मेंट प्रा. लि. प्रस्तुत ‘सिरियल वाल्या फॅमिलीची सस्पेन्स वाली कॉमेडी  सिरियल किलर’ हे नाटक ३१ ऑक्टोबर रोजी महाड १ नोव्हेंबर रोजी दापोली, रविवारी, दिनांक २ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र, खेड येथे रंगणार आहे.

या नाटकात गायत्री दातार, गौरी किरण, तेजस पिंगुळकर आणि भाऊ कदम या लोकप्रिय कलाकारांच्या अभिनयाची धमाल पाहायला मिळणार आहे. लेखन व दिग्दर्शन केदार आनंद देसाई यांचे असून, नेपथ्य प्रदीप मुल्ये, संगीत विजय नारायणगडे आणि प्रकाश स्वाम चव्हाण यांचा आहे. निर्माता प्रणय प्रभाकर तेली यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. ‘सिरियल किलर’ हे नाटक म्हणजे सस्पेन्स आणि कॉमेडीचा अफलातून संगम असून, संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.

प्रेक्षकांना हसवतानाच नात्यांमधील भावनांची उकल करणारे हे नाटक मराठी रंगभूमीवरील एक वेगळा अनुभव देणार आहे. तिकीट विक्री ३० ऑक्टोबरपासून नाट्यगृहावर सुरू होणार असून तिकीट दर ५००, ४०० आणि ३०० रुपये आहेत. प्रेक्षकांनी या फॅमिली कॉमेडी नाटकाचा आनंद घेण्यासाठी आपली जागा निश्चित करून ठेवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. संपर्क आणि फोन बुकिंगसाठी योगेश कुष्टे (९४२३२९३९५१) यांच्याशी संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3373879
Share This Article