GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी हिट अँड रन प्रकरणी दोषी चालकावर कठोर कारवाईबाबात पोलिसांना निवेदन

Gramin Varta
157 Views

रत्नागिरी: अतिवेगाने नियम मोडून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासंदर्भात शिवसेना शहर महिला आघाडीने शहर पोलिसांना निवेदन सादर केले.

या घटनेला जबाबदार असणाऱ्या व अतिवेगाने नियम मोडून चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासंदर्भात शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख स्मितल सुरेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस निरीक्षक श्री. पाटील, तसेच शहर वाहतूक पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, नगरसेविका वैभवी खेडेकर, पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, सायली पाटील, निवेदिता कळंबटे, राजश्री पिळणकर, प्रीती सुर्वे, मेधा कुलकर्णी, रुक्साना जकी, दिशा साळवी, तसेच महिला पदाधिकारी प्रिया साळवी, रूपाली नागवेकर, योगिता खांडेकर, अवंती गोडपकर, समीक्षा वालम प्राजक्ता खेडेकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Total Visitor Counter

3376126
Share This Article