देवरुख : साडवली कासारवाडी परिसरात दहा दिवसांपूर्वी जखमी अवस्थेत सापडलेल्या बिबट्याचा पुण्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
स्थानिकांनी काही दिवसांपूर्वी भरवस्तीत भटकणारा हा नर बिबट्या पाहिल्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्याला पकडून प्राथमिक उपचार केले होते. तपासणीत डाव्या पायाला खोल जखम असल्याचे आणि उच्च तापामुळे तो कमकुवत झाल्याचे आढळले. स्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील विशेष वन्यजीव उपचार केंद्रात हलवण्यात आले, मात्र तेथेही त्याचे प्राण वाचवता आले नाहीत.