GRAMIN SEARCH BANNER

वेंगुर्ल्यातील शेतकऱ्याची अनोखी कल्पकता; भाताच्या लोंबीपासून बनवला आकर्षक आकाशकंदील

Gramin Varta
24 Views

वेंगुर्ले : तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील तुळस या छोट्याशा गावातील विजय परब या शेतकऱ्यांनी आपल्या कल्पकतेला उत्तुंग भरारी देत भाताच्या लोंबींचा वापर करून अनोखा, आगळावेगळा असा आकाशकंदील तयार केला आहे. दिवाळीच्या पारंपरिक उत्सवाला नैसर्गिक स्पर्श देणारा हा कंदील पाहताक्षणीच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

दिवाळीत आकाशकंदील लावण्याची प्रथा असली, तरी पर्यावरणपूरक साहित्य वापरून तयार केलेला हा कंदील मात्र नव्या सर्जनशीलतेची झलक दाखवतो. शेतात कापणीदरम्यान मिळणाऱ्या भाताच्या लोंबी व्यवस्थित वाळवून, त्यांची मांडणी करीत हा कंदील तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तो केवळ सुंदरच नाही तर पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणास हितकारक आहे.

गावातील लोकांनीही विजय परब यांचे हे कौतुकास्पद काम पाहून आनंद व्यक्त केला आहे. सामाजिक माध्यमांवर या कंदीलाचा फोटो झपाट्याने व्हायरल होत असून, #Diwali2023 आणि #Lanton या हॅशटॅगद्वारे हा अनोखा दिवाळी संदेश सर्वत्र पोहोचत आहे.

Total Visitor Counter

3377069
Share This Article