दिल्ली: पद्म पुरस्कार २०२६ ची घोषणा करण्यात आली असून, या प्रतिष्ठित सन्मानासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्तींची एक प्राथमिक यादी समोर आली आहे. ही यादी अशा नायकांची आहे, ज्यांना २०२६ मध्ये पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे.
उत्तर प्रदेशातील चिरंजी लाल यादव, गुजरातचे धार्मिक लाल चुन्नी लाल पांड्या, छत्तीसगडच्या बुधरी ताती आणि ओडिशातील चरण हेम्ब्रम यांना गुमनाम नायक या श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील भगवान दास रायकवार, जम्मू-काश्मीरचे बृज लाल भट्ट, कर्नाटकचे अंके गौडा तसेच महाराष्ट्रातील आर्मिडा फर्नांडीज यांनाही देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री प्रदान केला जाणार आहे.
पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांची प्राथमिक यादी: अंके गौडा, आर्मिडा फर्नांडीज, भगवान दास रायकवार, भिकल्या लाडक्या ढिंडा, बृज लाल भट्ट, बुधरी ताती, चरण हेम्ब्रम, चिरंजी लाल यादव, धार्मिक लाल चुन्नी लाल पांड्या, गफरुद्दीन मेवाती जोगी, हैली वार, इंदरजीत सिंह सिद्धू, के. पाजनिवेल, कैलाश चंद्र पंत, खेम राज सुंद्रियाल, कोल्लक्कायिल देवकी अम्मा जी, कुमारस्वामी थंगराज, महेंद्र कुमार मिश्रा
मीर हाजीभाई कासंभाई, मोहन नागर, नरेश चंद्र देव वर्मा, निलेश विनोदचंद्र मंडलेवाला, नूरुद्दीन अहमद, ओथुवार तिरुथानी स्वामिनाथन, पद्मा गुरमेट, पोखिला लेकथेपी, पुन्नियामूर्ति नटेसन, आर. कृष्णन, रघुपत सिंह, रघुवीर तुकाराम खेड़कर, राजस्थापति कालीअप्पा गौंडर, रामा रेड्डी मामिडी, रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले, एस. जी. सुशीला अम्मा, सांग्युसांग एस. पोंगेनर, शफी शौक, श्रीरंग देवबा लाड, श्याम सुंदर, सिमांचल पात्रो, सुरेश हनगावड़ी,तगा राम भील , तेची गुबिन, तिरुवारूर भक्तवत्सलल, विश्व बंधु, युमनाम जात्रा सिंह
देशाच्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी-पद्मश्री निवड झालेल्या या सर्व ४५ गुमनाम नायकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात सन्मानित करण्यात येणार आहे.
पद्मश्री व्यतिरिक्त, भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म विभूषण’ आणि तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म भूषण’ यासाठी निवड झालेल्या मान्यवरांची यादीही लवकरच जाहीर केली जाणार आहे.
देशातील ‘या’ वीरांना यावर्षी मिळणार पद्म पुरस्कार






