GRAMIN SEARCH BANNER

केळये येथे बांधकाम कामगार नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न; १५० कामगारांची नोंदणी

Gramin Search
9 Views

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील केळये गावात शिंदे शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगार नोंदणी शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या शिबिरात केळये आणि म्हमूरवाडी येथील सुमारे १५० बांधकाम कामगारांनी ऑनलाइन नोंदणी करून योजनेचा लाभ घेतला.

पालकमंत्री ना. उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या सूचनेनुसार हे शिबिर घेण्यात आले. मजगावचे सरपंच फैयाझ मुकादम यांनी यावेळी बोलताना, शेवटच्या गरजू कामगारापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवेपर्यंत नोंदणी मोहीम सुरूच राहील, अशी ग्वाही दिली. केळये आणि म्हमूरवाडी येथील ग्रामस्थ आपल्या कुटुंबाप्रमाणेच असल्याचे सांगत, मिरजोळे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावाशी आपले कौटुंबिक संबंध असून, प्रत्येक गावात अशा प्रकारचे शिबिर राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

केवळ नोंदणीच नव्हे, तर संबंधित विभागाच्या अन्य योजनाही बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुकादम यांनी सांगितले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना पदाधिकारी संदीप नाखरेकर, सायली नाखरेकर, मजगावचे उपसरपंच बाबू इबजी, मुज्जू मुकादम, शकीला वाघधरे, इमाद इबजी, सुलताना आंबेडकर, प्रभावती लिंगायत, कैलास सुर्वे, नुझहत नाकाडे, कौसर पावस्कर, प्रणय धुळप, राधिका कलंबटे, आफा वाघधरे, प्रणय वायंगणकर, केळये ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, शिवसेना विभागप्रमुख प्रवीण पवार आणि केळये जमातीचे सहकार्य लाभले.

ना. उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे विविध उपक्रम यापुढेही सुरू राहणार असल्याचे मजगावचे सरपंच फैयाझ मुकादम यांनी नमूद केले.

Total Visitor Counter

2650726
Share This Article