रत्नागिरी / सिकंदर फरास: भारतीय हवामान विभागाने नवीन पावसाचा अंदाज वर्तवला आहे.नवीन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई, कोकण, नाशिक आणि धुळेसह अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रातभर पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पुढील एक ते दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू राहील आणि भारतीय हवामान खात्याने अनेक भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, कोकण, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या मते, आज चार कोकण जिल्ह्यांसाठी (रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर) येलो इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज मध्य महाराष्ट्रासाठी वादळाचा इशारा देण्यात आला आहे आणि नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि धुळे या चार जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याआधीपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान झाले असून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी आजुन चिंता वाढली आहे. कोकण किनारपट्टी तसेच आजूबाजूच्या परिसरात 3 नोव्हेंबर पर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपले






