GRAMIN SEARCH BANNER

दापोली : हर्णे येथे ८० वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
79 Views

दापोली: दापोली तालुक्यातील हर्णे राजवाडी येथील एका ८० वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. जयवंत भागोजी दुबळे (वय ८० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत जयवंत दुबळे हे राजवाडी हर्णे येथे वास्तव्यास होते. गुरुवारी सकाळी सुमारे ०८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा नातू कौशिक संजय दुबळे (वय २५,) हा त्यांना अंघोळीसाठी गरम पाणी आणि नाष्टा-चहा देण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता.

कौशिक दुबळे याने घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आले. त्याने बाहेरून आवाज दिला, परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने काहीतरी अनुचित घडल्याची शंका आल्यामुळे, त्याने दरवाज्याला जोरात ढकलून आत प्रवेश केला.

घरात आत जाताच त्याला स्वयंपाकघरामध्ये किचन ओट्यावर धक्कादायक दृश्य दिसले. जयवंत दुबळे यांनी लाकडी भालाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला होता आणि ते लटकलेल्या अवस्थेत आढळले.

या घटनेनंतर तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दापोली येथे दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासले आणि मृत घोषित केले.

दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अहवाल (आमू. क्रमांक ७४/२०२५) भारतीय न्याय सुरक्षा संहिता (BNSS) १९४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. घटनेची नोंद  करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3368659
Share This Article